

aaradhya bachchan height
esakal
आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रेक्षकांना प्रेमात पाडणारी बॉलिवूडची मिस वर्ल्ड अभिनेत्री ऐश्वर्या राय कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. तिच्या चित्रपटांसोबतच तिच्या इव्हेंटमधील प्रत्येक लूकची सोशल मीडियावर चर्चा रंगते. आईप्रमाणे ऐश्वर्याची लेक आराध्यादेखील नेटकऱ्यांमध्ये चर्चेत असते. बिग बींची नात आणि ऐश्वर्या- अभिषेकची मुलगी म्हणून नेटकरी तिच्याबद्दल जाणून घेण्यास उत्सुक असतात. लहानपणी गोड आणि लाघवी दिसणारी आराध्या आता पुन्हा एकदा तिच्या दिसण्यामुळे चर्चेत आहे. नुकत्याच समोर आलेल्या फोटोत आराध्या चक्क ऐश्वर्यापेक्षाही उंच दिसतेय.