Aarti Chabria Flaunts Baby Bump: वयाच्या 41 व्या वर्षी आई होणार 'ही' अभिनेत्री; बेबी बंप फ्लॉन्ट करत शेअर केला व्हिडीओ

Aarti Chabria Flaunts Baby Bump: एक खास व्हिडीओ शेअर करुन अभिनेत्रीनं ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.
Aarti Chabria
Aarti Chabriaesakal

Aarti Chabria Flaunts Baby Bump: सेलिब्रिटी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील अपडेट्स चाहत्यांना देत असतात. अशातच आता एका अभिनेत्रीनं सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या प्रेग्नन्सीची माहिती चाहत्यांना दिली आहे. वयाच्या 41 व्या वर्षी ही अभिनेत्री आई होणार आहे. एक खास व्हिडीओ शेअर करुन अभिनेत्रीनं ही गुडन्यूज चाहत्यांना दिली आहे.

आरतीनं दिली गुडन्यूज

अभिनेत्री आरती छाब्रियानं सोशल मीडियावर चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. लग्नाच्या पाच वर्षानंतर आरती आणि तिचा पती विशारद बीडासी हे आई-बाबा होणार आहेत. आरतीनं नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे. आरतीनं शेअर केलेल्या व्हिडीओला कमेंट्स करुन नेटकरी तिला आणि विशारदला शुभेच्छा देत आहेत.

पाहा व्हिडीओ:e

आरतीनं 'या' चित्रपटांमध्ये केलं काम

आरतीनं लज्जा या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तसेच तिनं अक्षय कुमारसोबत 'आवारा पागल दीवाना' या चित्रपटात आरती छाब्रियाने काम केलं, तसेच तिनं 'शूटआउट ॲट लोखंडवाला' आणि 'हे बेबी' यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील महत्वाची भूमिका साकारली आहे. 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या व्याह या पंजाबी चित्रपटात आरती दिसली होती. त्यानंतर मात्र आरतीनं सिनेसृष्टीमधून ब्रेक घेतला.

आरती छाब्रियाने अनेक ब्रँडच्या जाहिरातींमध्ये काम केलं आहे. रिपोर्ट्सनुसार, आरतीने 300 हून अधिक टीव्ही जाहिरातींमध्ये काम केलं आहे.

Aarti Chabria
Deepika Padukone and Ranveer Singh: गुडन्यूज दिल्यानंतर दीपवीर एअरपोर्टवर झाले स्पॉट; 'मॉम टू बी' दीपिकाला पाहून पापाराझी म्हणाले...

विशारदसोबत गुपचूप लग्न केले

आरतीनं 25 जून 2019 रोजी विशारदसोबत गुपचूप लग्न केले होते.आरती आणि विशारदच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. आरतीचा पती विशारद हा कर सल्लागार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com