AARTI SOLANKI REACTS TO AAMNE SAMANE
esakal
AARTI SOLANKI SHARES HER EXPERIENCE OF SUDDEN EXIT FROM A PLAY: सध्या सगळीकडे 'आमने सामने' नाटकाची चर्चा सुरु आहे. या नाटकातून अभिनेता रोहन गुजर आणि केतकी पालव यांनी अचानक काढून टाकण्यात आलं. मानधन वाढवून देणं शक्य नाही असं म्हणत त्यांना तडकाफडकी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. दोघांनी व्हिडिओ शेअर करत 'शेवटच्या प्रयोगात वेवस्थित निरोप सुद्धा घेता आला नसल्याची' खंत व्यक्त केली होती. त्यानंतर 'आमने-सामने'चे निर्माते आणि कलाकार लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी एक व्हिडिओ शेअर करत 'नाण्याच्या दोन बाजू असतात' असं म्हटलं. तसंच 'सतत मानधन वाढीची अपेक्षा होत असल्याने आम्ही असा निर्णय घेतल्याचं' स्पष्टीकरण त्यांनी दिलय.