

aarya ambekar
esakal
२००८ - ०९ साली एका कार्यक्रमाने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. तो कार्यक्रम होता 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' झी मराठीवरील हा कार्यक्रम घराघरात आवडीने पाहिला जायचा. या कार्यक्रमानेच पाच उत्कृष्ट गायक महाराष्ट्राला दिले. ज्यात कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत टॉप ५ मध्ये होते. ही ट्रॉफी कार्तिकीला मिळाली. मात्र इतरांनाही तिच्याइतकीच लोकप्रियता मिळाली. आजही हे सगळेच आपल्या करिअरमध्ये व्यग्र आहेत. अशातच आर्याने पहिल्यांदाच हा शो न जिंकण्याबद्दल भाष्य केलंय.