
तुम्हाला माहितीय का गेल्या ५ वर्षात सिनेमाची व्याख्या पूर्णपणे बदलून गेलीय. हा बदलावं निर्मात्यांसाठी खूप महत्वाचा आहे. यश मिळवण्यासाठी नाविन्यता हाच एकमेव मार्ग आहे. संख्येला जास्त महत्व दिल्यामुळे, दर्जेदार कथानकाच्या कमतरतेमुळे लोकांच्या मनात अविश्वास निर्माण झालाय. या सर्वांमध्ये जो खरंच चांगला असतो त्याला भोगावं लागत. नंतर अंडररेटेडचा टॅग देऊन आपणच म्हणतो हा साऊथमध्ये बनला असता तर हिट झाला असता. गेल्या ५ वर्षातील अशाच १० सिनेमाची यादी युट्युबर आणि चित्रपट समीक्षक संदेश वाहाणे याने तयार केलीय. चला बघूया.