
मराठी सिनेसृष्टीत असे अनेक चित्रपट होऊन गेले जे आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. त्यातील एक चित्रपट म्हणजे 'आयत्या घरात घरोबा'. १९९१ साली प्रदर्शित झालेला 'आयत्या घरात घरोबा' हा एक लोकप्रिय मराठी चित्रपट आहे. याचं दिग्दर्शन आणि निर्मिती अभिनेते सचिन पिळगावकर यांनी केली होती. हा चित्रपट १९४८ सालच्या हिंदी चित्रपट 'पगडी' वर आधारित होता. या चित्रपटात एक बंगला दाखवण्यात आला होता आणि ८० टक्के चित्रपट याच बंगल्यात शूट झालाय. तुम्हाला माहितीये का हा बंगला कुठे आहे?