

ab hoga hisaab
ESAKAL
संजय कपूर आणि मौनी रॉय यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'अब होगा हिसाब' या आगामी सीरिजचा थरारक ट्रेलर रिलीज झालाय. विदेशात जाण्याचं स्वप्न पाहणाऱ्या निष्पाप लोकांचा स्वतःच्या फायद्यासाठी कसा वापर केला जातो, यावर या सीरिजमध्ये भाष्य करण्यात आलंय. 'अॅमेझॉन एमएक्स प्लेयर'ने (Amazon MX Player) या ओरिजिनल रिव्हेंज ड्रामा सीरिजचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणला असून, पंजाबच्या पार्श्वभूमीवर बेतलेली ही कथा बॉबी आणि बंटी मनोचा या दोन भावांभोवती फिरते.