

ABHANGA TUKARAM
ESAKAL
ज्ञानोबा माऊली-तुकाराम”चा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजरात अवघ्या महाराष्ट्राला भक्तीचा संदेश देणारे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा जीवनप्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार आहे. बहुचर्चित ‘अभंग तुकाराम’ हा चित्रपट येत्या १५ मे २०२६ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार असून, आज ११ मे रोजी या चित्रपटाचा भव्य ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे.