
abhidnya bhave
esakal
आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी लोकप्रिय अभिनेत्री अभिज्ञा भावे हिने 'खुलता कळी ही खुलेना' मधून लोकप्रियता मिळवली. यात तिचं पात्र नकारात्मक असलं तरी ते प्रेक्षकांच्या मनावर कोरलं गेलं. तिने मालिकांसोबतच हिंदी जाहिराती आणि चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडली. सध्या अभिज्ञा 'तारिणी' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. अशातच नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने तिचा नवरा मेहुल पै याच्या आजारपणाबद्दल सांगितलंय. लग्नानंतर वर्षभरातच त्याला कॅन्सरचा आजार झाला होता. याबद्दल आता आई-वडिलांना कसं सांगायचं असा मोठा प्रश्न तिला पडला होता.