

Marathi Entertainment News : लग्न म्हणजे आनंद, गोंधळ, परंपरा आणि थोडीशी धावपळ… परंतु या सगळ्यावर जर अचानक ‘शॉट’ बसला तर? हाच प्रश्न उद्भवणाऱ्या ‘लग्नाचा शॉट’ या आगामी मराठी चित्रपटाचा टिझर लाँच सोहळा नुकताच मोठ्या जल्लोषात पार पडला. ढोल-ताशांचा गजर, लग्नघरातील उत्साह, धमाल आणि पारंपरिक विधींनी नटलेल्या या सोहळ्यात चित्रपटातील नवरा -नवरी अर्थात अभि आणि क्रितिका म्हणजेच अभिजीत आमकर आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांच्या केळवणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी दोघांनी एकमेकांसाठी उखाणेही घेतले. या रंगतदार सोहळ्यात भर टाकली ती, चित्रपटाच्या टीझरने. 'लग्नाचा शॉट'ची पहिलीच झलक उपस्थितांना प्रचंड भावल्याचे दिसतेय.