

Lagnacha Shot Trailer Out
esakal
Marathi Entertainment News : लग्न म्हणजे आनंद, गडबड, नात्यांची गुंफण आणि अनेक अनपेक्षित क्षणांचा संगम आणि हाच संगम मोठ्या पडद्यावर मांडण्यासाठी येत आहे आगामी मराठी चित्रपट ‘लग्नाचा शॉट’. या चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर नुकताच एका खास आणि हटके वातावरणात प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर लॉन्चचा हा सोहळा चक्क खऱ्या लग्नघरासारखा साकारण्यात आला होता, ज्यामुळे उपस्थितांना हा केवळ ट्रेलर लॉन्च न वाटता जणू प्रत्यक्ष लग्नसमारंभाचाच अनुभव मिळाला.