
बॉलिवूडचे लोकप्रिय गायक अभिजीत भट्टाचार्य हे त्यांच्या बिनधास्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या वक्तव्यांमुळे ते अनेकदा अडचणीत सापडले आहेत. आताही त्यांच्या एका वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी संगीतकार आरडी बर्मन हे महात्मा गांधी यांच्यापेक्षाही मोठे होते असं म्हटलं आहे. इतकंच नाही तर महात्मा गांधी हे भारत नाही तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते असंही ते म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यांनी एकच गोंधळ उडाला आहे.