पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यंटकांचा मृत्यू झाला. देशभरासह जगात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला. अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा या कलाकरांचा निषेध व्यक्त केला आहे. प्रत्येक जण दु:ख, राग व्यक्त करताना दिसत आहे. दरम्यान 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकले याने सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोंदींकडे बंदुकीची मागणी केली आहे. तसंच 'मला दहशतवाद्यांना मारु द्या' अशी विनंती सुद्धा केली आहे.