
तरुणाईला सुमधुर आवाजने वेड लावणारा प्रेक्षकांचा लाडका गायक म्हणजे अभिजीत सावंत ! फक्त संगीताची जादू नाही तर त्याने बिग बॉस सारख्या रियालिटी शो मधून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनात घर केलं बिग बॉस नंतर अभिजीत काय नवीन काम करणार कोणतं गाणं चाहत्यांच्या भेटीला घेऊन येणार याची उत्सुकता सगळ्यांना होती आणि अश्यातच आजच्या अक्षय तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर अभिजीत एक खास गाणं घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन आलाय.