लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण, अभिनय 'या' नाटकात करणार काम
Abhinay Berdeesakal

Abhinay Berde: लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण, अभिनय 'या' नाटकात करणार काम

अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आता व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करतोय.
Published on

Abhinay Berde: 'ती सध्या काय करते' (Ti Saddhya Kay Karte) या सिनेमातून पदार्पण करत सगळ्यांची मनं जिंकणारा चॉकलेट अभिनय बेर्डे (Abhinay Berde) आता व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करतोय. अभिनयने आजवर वेगवेगळ्या सिनेमातून प्रेक्षकांची मनं जिंकली आणि आता तो 'आज्जीबाई जोरदार' या बालनाट्यातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. नुकतंच सोशल मीडियावर त्याने या नाटकाचे पोस्टर शेअर करत त्याने ही बातमी चाहत्यांसोबत शेअर केलं. आताची तरुणपिढी आणि त्यांचे पालक यांच्यावर हे आधारित नाटक असल्याचं म्हंटलं जातंय.

"तुम्हा प्रेक्षकांच्या प्रेमाने आणि आईबाबांच्या आशीर्वादाने आज नाटकात पहिलं पाऊल टाकतोय! माझं पाहिलं व्यावसायिक मराठी नाटक, आज्जीबाई जोरात!" असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलंय. शाळेचा युनिफॉर्म घातलेला अभिनयचा हा फोटो सोशल मीडियावर गाजतोय. अभिनयच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत अनेकांनी त्याचं अभिनंदन केलं. सध्या या नाटकाच्या तालमी सुरु असून 30 एप्रिल 2024 ला या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडणार आहे. क्षितिज पटवर्धनने या नाटकाचं लेखन दिग्दर्शन केलं असून हे पहिलं AI महाबालनाट्य असणार आहे. या बालनाट्यात मुग्धा गोडबोले, जयवंत वाडकर यांच्याही मुख्य भूमिका आहेत. तर अभिनेत्री निर्मिती सावंत या आजीच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. यासोबतच अभिनेता पुष्कर श्रोत्री हा सुद्धा एका अतरंगी भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. यासोबतच सिद्धेश पुजारे आणि सुकन्या यांच्याही या नाटकात भूमिका आहेत. शिवाय या नाटकात 11 नर्तक आहेत.

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकाचं रंगभूमीवर पदार्पण, अभिनय 'या' नाटकात करणार काम
Abhinay Berde: तू मावा खातोस का? अभिनय बेर्डेला नेटकऱ्याचा प्रश्न, म्हणाला..

30 एप्रिल 2024 ला मंगळवारी दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्लेमध्ये या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडणार आहे. सकाळी ११ आणि दुपारी ४ वाजता असे दोन प्रयोग असतील. जिगीषा आणि अष्टविनायक यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. अभिनयने आजवर ‘अशी ही आशिकी’, ‘मन कस्तुरी रे’, ‘रंपाट’, ‘बॉईज ४' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. तर निर्मिती यांचं रंगभूमीवर 'व्हॅक्युम क्लिनर' हे नाटक सुरु असून या नाटकात अशोक सराफ यांचीही मुख्य भूमिका आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com