
अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचं बोललं गेलं. अनेक पोस्ट आणि बातम्यांमधुन ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा घटस्फोट होणार असल्याची चर्चा झाली. अनेक माध्यमांनी त्यांचं नातं संपलं असून ते एकत्र राहत नसल्याचं सांगितलं होतं. मात्र यावर ऐश्वर्या आणि अभिषेक कधीही काहीही बोलले नाहीत. आता अखेर यासगळ्यावर अभिषेकने मौन सोडलं आहे. तो आजवर याविषयावर काहीही का बोलला नाही याबद्दल त्याने सांगितलं आहे.