
Entertainment News : पुरस्कारप्राप्त आणि समीक्षकांकडून गौरवलेला ‘Stolen’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, प्रेक्षकांना एका रोमांचकारी आणि भावनांनी भरलेल्या प्रवासाची झलक मिळाली आहे. या ट्रेलरमध्ये न्याय आणि सूड यांची सीमा कशी धुसर होते हे प्रभावीपणे दाखवण्यात आले आहे. आता या चित्रपटातील सर्वात शक्तिशाली आणि भावनिकदृष्ट्या तीव्र सीनपैकी एकाचा व्हिडिओ निर्मात्यांनी शेअर केला आहे.