
Marathi Entertainment News : गेली 5 वर्षं मराठी टेलिव्हिजनवर अधिराज्य गाजवणारी आई कुठे काय करते ही मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेतेय. 30 नोव्हेंबरला या मालिकेचा अखेरचा भाग प्रदर्शित होतोय. तर नुकतंच या मालिकेच्या शेवटच्या भागाचं शूटिंग पार पडलं. मालिकेच्या शेवटच्या दिवशी या मालिकेत विविध भूमिका साकारणारे सगळे कलाकार उपस्थित होते. या मालिकेत यश ही महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या अभिनेता अभिषेक देशमुखने एक सोशल मीडिया पोस्ट लिहीत त्याच्या भावना व्यक्त केल्या.