
Entertainment News : सीआयडी सीजन 2 हा प्रेक्षकांच्या भेटीस आला. प्रेक्षकांच्या मागणीनंतर बऱ्याच काळाने सीआयडीचा दुसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीस आला. गेल्या काही महिन्यात या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळाले. त्यातच एसीपी प्रद्युमनचा मृत्यू दाखवण्यात आला आणि नवीन एसीपी म्हणून पार्थ समथानची एंट्री झाली. पण त्यानंतर काहीच दिवसात पार्थची एक्झिट होणार असल्याचं सांगण्यात आलं. त्यातच आता मालिकेत नवीन ट्विस्ट आला आहे.