
बॉलिवूडमध्ये कलाकारांच्या मानधनाबरोबरच त्यांच्या टीमवरील प्रचंड खर्चावर टीका होत असताना, आमिर खानने यावर आपलं मत मांडलं.
आमिरच्या मते, मेकअपमन, हेअर ड्रेसर, कॉस्च्युम डिझायनर यांचा खर्च निर्मात्याने उचलणं योग्य आहे, कारण ते चित्रपटाशी थेट संबंधित आहेत.
मात्र, कलाकारांच्या वैयक्तिक स्टाफचा खर्च निर्मात्यावर टाकणं अन्यायकारक असल्याचं आमिर खानचं स्पष्ट मत आहे.