बिग बॉस नंतर आयुष संजीवची नवी इनींग ! 'या' गाण्याचं केलं दिग्दर्शन आणि कोरियोग्राफी

Ayush Sanjeev New Project : बिग बॉस मराठीमधून काही दिवसांपूर्वीच बाहेर पडलेला आयुष संजीवचा नवा प्रोजेक्ट प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. जाणून घेऊया त्याच्या नव्या प्रोजेक्टविषयी.
Ayush Sanjeev New Project

Ayush Sanjeev New Project

esakal

Updated on

Marathi Entertainment News : संगीत विश्वात 'मिलीनीयर' म्हणून ओळख असणाऱ्या संगीतकार प्रशांत नाकतीच्या 'माझी बाय' या गाण्याने तब्बल 100 मिलीयन व्ह्यूजचा टप्पा पार करत इतिहास रचला. आता या गाण्याचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. आणि अल्पावधीतच या गाण्याला रसिकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. या गाण्याची खास बाब म्हणजे या गाण्याच्या दिग्दर्शनाची धुरा 'बिग बॉस मराठी'फेम आयुष संजीवने सांभाळली आहे. इतकंच नाहीतर या गाण्याची कोरियोग्राफीही आयुषने केली आहे. त्यामुळे आयुष या नव्या पदार्पणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 'बिग बॉस' नंतर आयुष नेमकं काय करणार याकडे साऱ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या, अखेर आयुष 'माझी बाय' या गाण्यातून एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून भेटीस आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com