
Bollywood Entertainment News : बॉलिवूडमध्ये स्टारपद मिळवण्यासाठी कलाकारांना खूप मेहनत करावी लागते. काही जणांचं एक चांगली भूमिका करण्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची पडतं. अगदी सुपरस्टारची मुलं असूनही अनेकजण बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख बनवण्यात अयशस्वी ठरले आहेत. पण याला अपवाद ठरला अभिषेक बच्चन. सुपरस्टार वडिलांचा वारसा असूनही अभिषेकने उत्तम अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये ओळख कमावली आहे. आज 5 फेब्रुवारीला अभिषेकचा वाढदिवस आहे.