नशीबवान मालिकेनंतर आदिनाथ कोठारेचा नवा प्रोजेक्ट ! साकारणार डिटेक्टिव्हची भूमिका

Adinath Kothare New Project : अभिनेता आदिनाथ कोठारे नव्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जाणून घेऊया त्याच्या नव्या भूमिकेविषयी आणि प्रोजेक्टविषयी.
नशीबवान मालिकेनंतर आदिनाथ कोठारेचा नवा प्रोजेक्ट ! साकारणार डिटेक्टिव्हची भूमिका
Updated on

Marathi Entertainment News : अभिनेता आदिनाथ कोठारे आणि पुष्कराज चिरपुटकर यांच्या प्रमुख भूमिकांसह शिरगाव या रहस्यमय शहरावर आधारित ‘डिटेक्टिव्ह धनंजय-रहस्यजाल’ या मराठी ओरिजनल थरारपटांची घोषणा मराठी ZEE5ने केली आहे. श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित आणि गिरीश जयंत जोशी लिखित ही मालिका बाबुराव अर्नाळकर यांच्या गाजलेल्या साहित्यिक निर्मितीवर आधारित आहे. इंडियन मॅजिक आय आणि स्टोरीटेलर्स नुक यांनी ही निर्मिती केली आहे. या मालिकेचा प्रीमियर दिनांक 1 मे 2026 रोजी मंचावर होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com