

Ajinkya Deo On Bollywood Bad Experience
esakal
Bollywood News : मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या देखण्या व्यक्तिमत्त्वामुळे आणि दमदार अभिनयामुळे ओळखले जाणारे अजिंक्य देव हे आजही प्रेक्षकांच्या मनात खास स्थान राखून आहेत. ‘माहेरची साडी’, ‘सर्जा’, ‘कशासाठी प्रेमासाठी’ आणि ‘माझं घर माझा संसार’ सारख्या चित्रपटांतून त्यांनी लोकप्रियता मिळवली. मराठी पडद्यावर अपार यश मिळाल्यानंतर त्यांनी हिंदी सिनेमांकडे वळण्याचा प्रयत्न केला.