
Marathi Entertainment News : अभिनेता तुषार घाडीगांवकरने शुक्रवारी राहत्या घरी स्वतःच आयुष्य संपवलं. त्यामुळे संपूर्ण मराठी इंडस्ट्रीला धक्का बसला. अनेक मराठी कलाकारांनी तुषारसाठी पोस्ट करत त्याला श्रद्धांजली वाहिली. काम मिळत नसल्याच्या नैराश्याने त्याने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जातंय. अभिनेता अजिंक्य राऊतने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत मराठी इंडस्ट्रीबद्दल धक्कादायक खुलासा केला.