
अल्लू अर्जुनशी संबंधित एक मोठी बातमी आहे. अभिनेत्याच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि तोडफोड करण्यात आली आहे. उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी रविवारी संध्याकाळी गोंधळ घातला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अल्लू अर्जुनने संध्या थिएटर दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या महिलेला एक कोटी रुपये द्यावेत, अशी या आंदोलकांची मागणी आहे. यासोबतच कुटुंबाला सर्वतोपरी मदत करा. यामुळे अल्लू अर्जूनच्या घराबाहेर दगडफेक करण्यात आली.