
Bollywood Entertainment News : ऑपरेशन सिंदूरनंतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी भारतीय सैन्याचं अभिनंदन केलं. पण भारतातील दिग्गज सेलिब्रिटी अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि सलमान खान यांनी सोशल मीडियावर मौन बाळगलं. यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली. पण नुकतंच अमिताभ यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ऑपरेशन सिंदूरबद्दल भावना व्यक्त केल्या.