
Marathi Entertainment News : नाटक हा मराठी कलाकारांचा प्राण आहे असं म्हणायला हरकत नाही. उत्तम नाटक मिळणं आणि त्यात काम करत राहणं हे हाडाच्या कलाकाराचं स्वप्न असतं. पु ल देशपांडे लिखित सुंदर मी होणार हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत आहे. मराठी अभिनेता अमोल बावडेकर या नाटकात काम करणार होता. पण नाटकाच्या प्रयोगापूर्वीच त्याला हृदयविकाराचा झटका आला. ज्यामुळे नाटकाचा प्रयोग रद्द करण्यात आला.