
Bollywood News : भारतातील डिजिटल मनोरंजनविश्वात अग्रगण्य ठरलेल्या TVF (The Viral Fever) च्या ‘ग्राम चिकित्सालय’ या नव्या आणि दिलाला भिडणाऱ्या शोमुळे अभिनेता अमोल पराशर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी तो केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर आपल्या करिअरमधील एका अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती TVF चे संस्थापक अरुणाभ कुमार यांच्या विषयी कृतज्ञतेने भरलेला एक भावनिक संदेश सोशल मीडियावर शेअर केल्यामुळेही चर्चेचा विषय ठरत आहे.