
Marathi Entertainment News : मराठी चित्रपटसृष्टीतील एक अनोखा आणि वेगळा विचार घेऊन प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारा अभिनेता, दिग्दर्शक पुष्कर जोग पुन्हा एकदा एका अनोख्या विषयावर भाष्य करणारा चित्रपट प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘हार्दिक शुभेच्छा … पण त्याचं काय?’ असून लैंगिक सुसंगतता या विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं.