
Bollywood Entertainment News : सध्या एका पोस्टरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु असून ही चर्चा दुसरी तिसरी कोणाची नसून महाराष्ट्राचा सुपरस्टार अंकुश चौधरीची आहे. ‘पी. एस. अर्जुन’च्या भूमिकेत अंकुश राडा घालायला येतोय. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक पोस्टर शेअर करत 'अर्जुन माझ्या नावात... वर्दी माझी जोमात... गुन्हेगार कोमात...! अशी जबरदस्त कॅप्शन दिली आहे. अंकुशचा पोलिसांच्या वर्दीतील हा डॅशिंग लूक कमाल दिसत असून 'महाराष्ट्र शाहीर' चित्रपटानंतर दोन वर्षांनी अंकुश प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे.