
कन्नड अभिनेता दर्शन थुगुदीपा आणि त्याची मैत्रीण पवित्रा गौडा यांचा जामीन गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने त्यांना बंगळूरु पोलिसांनी पुन्हा अटक केली आहे. पवित्रा (आरोपी क्रमांक १) आणि दर्शन (आरोपी क्रमांक २) यांना वैद्यकीय तपासणीनंतर ट्रायल कोर्टासमोर हजर केले जाईल आणि त्यानंतर त्यांची रवानगी तुरुंगात करण्यात येईल. पोलिसांनी या प्रकरणात इतर तीन सह-आरोपी, प्रदूष एस राव ऊर्फ प्रदूष, लक्ष्मण एम आणि नागराजू आर यांनाही अटक केली आहे. लवकरच अनु कुमार ऊर्फ अनु आणि जगदीश ऊर्फ जग्गा यांनाही अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.