चेहऱ्यावर क्रूरता आणि हातात सुरा ! घबाडकुंडमधील देवदत्त नागेचा लूक चर्चेत

Devdatta Nage Look In Ghabadkund Movie Out : घबाडकुंड सिनेमात देवदत्त नागे विशेष भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. जाणून घेऊया त्यांच्या भूमिकेविषयी आणि लुकविषयी,
चेहऱ्यावर क्रूरता आणि हातात सुरा ! घबाडकुंडमधील देवदत्त नागेचा लूक चर्चेत
Updated on

Entertainment News : हिंदी आणि तेलुगू सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप उमटवल्यानंतर अभिनेता देवदत्त नागे आता मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण करत आहे. आतापर्यंत प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर आलेला अभिनेता देवदत्त नागे आता पुन्हा एकदा नव्या आणि दमदार अवतारात दिसणार आहे. आपल्या भूमिकांमध्ये नेहमीच वैविध्य जपणाऱ्या देवदत्त नागे यांचा ‘घबाडकुंड’ या आगामी चित्रपटातील लूक विशेष चर्चेचा विषय ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com