
'दशावतार' या आगामी मराठी चित्रपटाचे रहस्यमय पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले असून, त्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
कोकणातील प्राचीन दशावतारी परंपरेवर आधारित हा चित्रपट सुबोध खानोलकर यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.
पोस्टरमधील रौद्र चेहरा दिलीप प्रभावळकर यांचा आहे का, असा चर्चेचा विषय निर्माण झाला आहे.