
Marathi Entertainment News : रत्नाकर मतकरी यांच्या लेखणीतून जन्मलेली रहस्यकथा आणि त्याला रंगभूमीवरील दृश्यरूप देणारा कल्पक, अनुभवी दिग्दर्शक म्हणजे विजय केंकरे. उत्कृष्ट लिखाण आणि दिग्दर्शनामुळे ‘श्श… घाबरायचं नाही’ नाटक सध्या चर्चेत आहे. बदाम राजा प्रॉडक्शन प्रस्तुत या सादरीकरणात ‘पावसातला पाहुणा’ आणि ‘जेवणावळ’ या मतकरींच्या दोन गूढ कथांचं एक नाट्यमय रूप प्रेक्षकांसमोर उभं राहणार आहे. विजय केंकरे या नाटकाचं दिग्दर्शन करत असून त्यांचं गूढ कथांवरील प्रेम, तितक्याच प्रभावीपणे रंगमंचावर उतरवलेलं दिसतं.