
SHANTANU GANGANE
esakal
कलाकार म्हंटले की त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या मुलांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. मोठमोठ्या कलाकारांची मुलं कुठल्या शाळेत जातात इथपासून त्यांची फी किती इथपर्यंत सगळं प्रेक्षकांना जाणून घ्यायचं असतं. सेलिब्रिटीही आपल्या मुलांना मोठ्या शाळांमध्ये पाठवताना दिसतात. मात्र असा एक मराठी अभिनेता आहे ज्याने आपल्या मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. एक पोस्ट करत त्याने याबद्दल माहिती दिली आहे. हा अभिनेता आहे शंतनू गंगणे.