
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील हँडसम अभिनेता गश्मीर महाजनी त्याच्या अभिनयाबरोबरच त्याच्या वक्तव्यांसाठीही प्रसिद्ध आहे. हुशार अभिनेता म्हणून त्याने सध्या प्रेक्षकांमध्ये लौकिक मिळवलेला. फक्त अभिनयक्षेत्रच नाही तर इतर विषयांवरही तो मांडत असलेली मतं अनेकांना पटतात. नुकतंच त्याने आर्थिक नियोजनावर महत्त्वपूर्ण भाष्य केलं.