
Marathi Entertainment News : महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता गौरव मोरे सध्या अनेक प्रोजेक्टमध्ये काम करत आहे. हिंदी सिनेसृष्टीतही त्याने काही प्रोजेक्ट्समध्ये काम केलं आहे. नुकतीच गौरवने नवीन गाडी खरेदी केली. मोठी गाडी घेण्याचं स्वप्न त्याने पूर्ण केलं. सोशल मीडियावरून त्याने ही आनंदाची बातमी शेअर केली.