Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

अभिनेता गौरव मोरेने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम सोडला. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने ही बातमी जाहीर केली.
Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...

सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा हा प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम. या कार्यक्रमामुळे आजवर मराठी इंडस्ट्रीला एक से एक टॅलेंटेड कलाकार मिळाले आहेत. यातीलच एक गाजलेला कलाकार म्हणजे गौरव मोरे. "Hello everyone i am a gaurav more from powai filter pada Ta na na na na naaaaaa" अशी सुरुवात करत सगळ्यांचं लक्ष वेधून घेणाऱ्या गौरवला महाराष्ट्राची हास्यजत्रामुळे खूप प्रसिद्धी मिळाली.

गौरव आता पुन्हा या कार्यक्रमात प्रेक्षकांना दिसणार नाही. नुकतंच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने महाराष्ट्राची हास्यजत्रा हा कार्यक्रम सोडत असल्याचं जाहीर केलं.

काय म्हणाला गौरव?

गौरवने सोशल मीडियावर आज पोस्ट शेअर केली. त्यात तो म्हणतो,"Hello everyone i am a gaurav more from powai filter pada

Ta na na na na naaaaaa

आरा बाप मारतो का काय मी….ये बच्ची……☺️

रसिक प्रेक्षक आपण हया साध्या मुलाला खूप प्रेम दिलं. नाव दिलं सन्मान दिलात त्याबद्दल मी आणि माझा परिवार आपले कायम ऋणी आहोत..

मला सांगताना खूप वाईट वाटतय की मी गौरव मोरे आपल्या लाडक्या मालिकेतून म्हणजेच “महाराष्ट्राची हास्य जत्रा” मधुन आपला निरोप घेत आहे.

माझ्या कामातून कोणच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी त्या सगळ्यांची मनापासुन माफी मागतो.

महाराष्ट्राची हास्य जत्रा सोडून अगदीच काही दिवस झाले आणि नवा शो घेऊन तुमच्या भेटीला आलो माध्यम सारखं राहिलं आणि तुमचं प्रेम देखील ! असं म्हणतात ना नव्या प्रवासाची गोष्ट और असते आणि म्हणूनच नव्या प्रवासात नव्या शो साठी तुमचा खंबीर पाठिंबा कायम असावा. नवा प्रवास सुरू झाला आणि यातून देखील तुमच्या सारख्या रसिक प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे म्हणून तुमचा आशीर्वाद आणि शुभेच्छा प्रेम असच राहू दे❤️"

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...
Maharashtrachi Hasyajatra: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याची स्वप्नपूर्ती; पोस्ट शेअर करुन म्हणाला, “यासाठी केला होता अट्टाहास…”

गौरवच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत त्याला नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या. हास्यजत्रामधील त्याचे सहकारी कलाकार समीर चौघुले, प्रियदर्शिनी इंदलकर यांनीही कमेंट करत गौरवला त्याच्या नव्या इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. समीर यांनी "तुला खूप शुभेच्छा...गौरव....खूप प्रेम" असं म्हणत गौरवला शुभेच्छा दिल्या. गौरवने या पोस्टमध्ये हास्यजत्रेच्या सेटचा व्हिडीओ शेअर केला आहे.

गौरव सध्या सोनी हिंदी टेलिव्हिजनवरील 'मॅडनेस मचायेंगे' या कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. त्याने त्याच्या अभिनयाने आणि कॉमेडी सेन्सने मराठी प्रेक्षकांसोबत आता देशभरातील इतर भाषिक प्रेक्षकांचंही मन जिंकून घेतलं आहे. या कार्यक्रमात तो, कुशल आणि हेमांगी मिळून करत असलेले स्किट्स खूप गाजतात. सोशल मीडियावर त्यांच्या स्किट्सचे व्हिडीओ व्हायरल होतात.

Gaurav More : गुडबाय हास्यजत्रा ; गौरवने घेतला हास्यजत्रेचा निरोप ; समीर दादा म्हणाला...
Maharashtrachi Hasya Jatra: पॉर्न बघणाऱ्यांनी 'हास्यजत्रे'वर टीका करू नये.. 'त्या' कमेंटवर भडकला अभिनेता..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com