Subodh Bhave : सुबोधचं बायकोला गोड सरप्राईज; सोशल मीडियावर होतंय कौतुक

अभिनेता सुबोध भावेने त्याची बायको मंजिरीला गोड सरप्राईज दिलं. सोशल मीडियावर त्याने पोस्ट केलेल्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Subodh Bhave special post for wife
Subodh Bhave special post for wife

Subodh Bhave: मराठी सिनेविश्वातील आघाडीचा सुबोध भावेचे अनेकजण फॅन आहेत. उत्तम अभिनेता याबरोबरच उत्तम दिग्दर्शक म्हणूनही सुबोधने स्वतःची ओळख बनवलीय. सोशल मीडियावर सुबोध नेहमीच काही ना काही पोस्ट शेअर करून चाहत्यांशी संवाद साधत असतो. नुकतंच त्याने शेअर केलेल्या व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.

सुबोधने आपल्या सोशल मिडियावर एक अनोखा आणि विशेष असा व्हिडिओ शेअर केला आहे. तो विशेष यासाठी आहे की आजच्याच दिवशी ६ मे १९९१ रोजी सुबोधने त्याची पत्नी मंजिरी हिला प्रपोझ केलं होतं आणि आज तब्बल ३३ वर्षांनी सुबोधने त्या दिवसाला उजाळा दिला आणि मंजिरीला शुभेच्छा दिल्या आहेत. "मंजिरी,

३३ वर्षांपूर्वी आपलं प्रेमाचं नातं खऱ्या अर्थाने सुरू झालं आणि 'जगण्यासाठी श्वासाची नाही प्रेमाची गरज असते', हे मला कळलं.

आपली ही एक गोड आठवण आज मी तुझ्यासोबत नव्याने शेअर करतोय, पण जराशा हटके पद्धतीत.

हा खास व्हिडिओ फक्त तुझ्यासाठी…." असं कॅप्शन याने या व्हिडिओला दिलं आहे.

पहा व्हिडीओ:

या व्हिडिओमधून सुबोधने त्याची बायको मंजिरीला ३३ व्या प्रपोजल डेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे सुबोधचा चेहरा तो ३३ वर्षांपूर्वी जसा दिसायचा तसा दिसतोय. सुबोधच्या या कृतीच अनेकांनी कौतुक केलं पण त्याने हा लूक का केला असावा असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

अनेकांनी कमेंट करत सुबोधच्या या पोस्टचं कौतुक केलं आणि त्याला उत्तम सहजीवनासाठी शुभेच्छा दिल्या.

'हा' आहे सुबोधचा आगामी सिनेमा

सुबोधचा लवकरच संगीत मानापमान हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. कट्यार काळजात घुसली या सिनेमानंतर सुबोध 'संगीत मानापमान' या सिनेमाचं दिग्दर्शन करत असून १ नोव्हेंबर २०२४ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. सुबोध या सिनेमात धैर्यधर ही भूमिका साकारतोय. या सिनेमात आणखी कोण कलाकार काम करणार आहेत हे अजून रिव्हील करण्यात आलं नाहीये.

Subodh Bhave special post for wife
Subodh Bhave: "आजुबाजुला हिंदी सिनेमांच्या गर्दीत आमचा मराठी चित्रपट...", सुबोध भावेची सणसणीत पोस्ट व्हायरल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com