

GOVINDA ON SUNITA AHUJA CHEATING CLAIMS
ESAKAL
बॉलिवूड अभिनेता गोविंदा गेले कित्येक महिने सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याचं कारण म्हणजे त्याचं खासगी आयुष्य. अभिनेत्याच्या पत्नीने म्हणजेच सुनीता अहुजाने काही महिन्यांपूर्वी अचानक एक धक्कादायक खुलासा केला होता की गोविंदा त्याच्यापेक्षा अर्ध्या वयाच्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. त्यानंतर सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला. त्यानंतरही दिलेल्या अनेक मुलाखतीत सुनीताने गोविंदाच्या इतरही एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरबद्दल सांगितलं. तो घरी कमी आणि बाहेर जास्त असतो असं ती म्हणाली. आता पत्नीच्या आरोपांवर गोविंदाने उत्तर दिलं आहे.