
बहुप्रतिक्षित ‘कांतारा: अध्याय 1’ या पॅन-इंडिया सिनेमामध्ये अभिनेता गुलशन देवय्या कुलशेखर या भूमिकेत झळकणार असून त्याचा फर्स्ट लुक नुकताच प्रदर्शित झाला.
हा सिनेमा 2022 मधील ब्लॉकबस्टर ‘कांतारा’ चा प्रिक्वेल असून, लेखन-दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका ऋषभ शेट्टी यांनीच साकारली आहे.
पहिल्या भागात जसा लोककथा, अध्यात्म आणि भावना यांचा संगम दिसला, तसाच हा प्रिक्वेल कथानकाच्या मुळाशी जाऊन आणखी गहिरे आणि प्रभावी पैलू उलगडणार आहे.