
‘अरण्य’ चित्रपटाचा टिझर आणि पहिलं गाणं ‘रेला रेला’ प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता आणि उत्साह अधिक वाढला आहे.
हार्दिक जोशी आणि वीणा जगताप यांच्या लग्नसोहळ्यावर चित्रित हे गाणं ऊर्जा, सांस्कृतिक रंगत आणि पारंपरिक ढंगाने भारलेलं आहे.
अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाजासोबत नितीन उगलमुगले यांचं संगीत आणि मुकुंद भालेराव यांच्या अतिरिक्त ओळींमुळे हे गाणं प्रेक्षकांना थिरकायला भाग पाडत आहे.