
Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील एक बोल्ड आणि तितकीच उत्तम अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर. फक्त मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही अमृताने स्वतःची ओळख बनवली आहे. अमृताचा नवरा हिमांशूची जुनी मुलाखत व्हायरल होतेय. या मुलाखतीत त्याने बायको त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी असल्याबद्दल त्याला काय वाटतं यावर भाष्य केलं.