Bollywood News : बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशनने सोशल मीडियावर खळबळ उडवत स्पष्ट केलं आहे की तो एनटीआरसाठी २० मे २०२५ रोजी एक स्फोटक बर्थडे सरप्राइझ घेऊन येत आहे – आणि ते देखील ‘वॉर २’ च्या माध्यमातून!.हृतिकने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिलं: "हे एनटीआर ,तुला वाटतंय की २० मे ला काय होणार याची कल्पना आहे? विश्वास ठेव, तुला अजिबातच अंदाज नाही काय येतंय. तयार आहेस का?" सोशल मीडियावर थोड्याचवेळात ही पोस्ट व्हायरल झाली. या पोस्टमुळे अनेकांना धक्का बसला. .ही पोस्ट पाहताच सोशल मीडियावर अक्षरशः चकित झाले आणि चाहत्यांमध्ये ‘वॉर २’मधील एखाद्या मोठ्या घोषणेची चर्चा सुरू झाली आहे.‘वॉर २’मध्ये हृतिक रोशनचा ‘कबीर’ पुन्हा एकदा धडकणार आहे, तर एनटीआर या चित्रपटात पहिल्यांदाच वायआरएफ स्पाय युनिव्हर्समध्ये एन्ट्री करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे आयन मुखर्जी, ज्याला तरुण आणि प्रतिभावान दिग्दर्शक म्हणून ओळखलं जातं. .चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.वायआरएफ स्पाय युनिव्हर्स ही सध्या भारतीय सिनेमातील सर्वात मोठी आणि यशस्वी फ्रँचाईज आहे, ज्यात ‘एक था टायगर’, ‘टायगर जिंदा है’, ‘वॉर’, ‘पठाण’ आणि ‘टायगर ३’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट आहेत. ‘वॉर २’ हा या युनिव्हर्समधील सहावा चित्रपट ठरणार आहे.. २० मे ला काय होणार याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. तयार राहा, कारण हृतिक आणि एनटीआर एकत्र येणार म्हणजे काहीतरी जबरदस्त होणार हे नक्की!.Video : दीपिका कक्करच्या लिव्हरमध्ये गाठ, शोएब इब्राहिम व्हिडिओ शेअर करत म्हणाला,'प्लीज तिच्यासाठी प्रार्थना करा.....'.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.