
Entertainment News : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक प्रतिष्ठित कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेते कमल हासन. अभिनय, दिग्दर्शन, लेखन आणि निर्मिती अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला अमीट ठसा उमटवला आहे. त्यांनी आजवर साकारलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांचे केवळ मनोरंजनच केले नाही तर विचारप्रवृत्तही केलं आहे. आता कमल हासन ‘ठग लाईफ’ या बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.
हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार असून, त्यामध्ये एसटीआर (सिलंबरसन), तृषा कृष्णन, अभिरामी, ऐश्वर्या लक्ष्मी यांसारख्या प्रतिभावान कलाकारांची साथ त्यांना लाभली आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन मणिरत्नम यांनी केलं असून संगीताची जबाबदारी ए. आर. रेहमान यांनी पार पाडली आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील तीन आयकॉन या चित्रपटासाठी एकत्र आलेले आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने कमल हासन यांच्याशी साधलेला खास संवाद..