Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Actor Ketan Singh apologies to Karan Johar after social media Post : करण जोहरने त्याची नक्कल करणाऱ्या अभिनेता केतन सिंहवर नाराजी व्यक्त केल्यानंतर केतनने त्याची जाहीर माफी मागितली. काय म्हणाला केतन सिंह जाणून घेऊया.
Actor Ketan Singh apologies to Karan Johar after social media Post
Actor Ketan Singh apologies to Karan Johar after social media Post

Karan Johar : निर्माता करण जोहर (Karan Johar) कायमच त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे आणि फॅशन सेन्समुळे चर्चेत असतो. त्याचा कॉफी विथ करण हा शो ओटीटीवरील लोकप्रिय कार्यक्रमांपैकी एक आहे. परखड मतांसाठी प्रसिद्ध असलेला केजो बऱ्याचदा त्याला न आवडलेल्या गोष्टींबाबत मोकळेपणाने सोशल मीडियावर व्यक्त होतो.

नुकतंच एका रिअॅलिटी शोमध्ये केतन सिंह (Kettan Singh) नावाच्या कलाकाराने करणची नक्कल केली. त्या कॉमेडियनने त्याची नक्कल अपमानास्पदरित्या करणं करणला अजिबात आवडलं नाही आणि सोशल मीडियावर पोस्ट लिहीत करणने याबाबत त्याच्या भावना व्यक्त केल्या.

या घटनेची चर्चा सुरु असतानाच करणची नक्कल करणाऱ्या अभिनेता केतन सिंहने त्याची एका मुलाखतीमध्ये जाहीररित्या माफी मागितली.

करणची ही पोस्ट चर्चेत असताना टाईम्स नाऊला केतनने मुलाखत दिली. तो म्हणाला,"प्रथम मी करण सरांची माफी मागतो. मी जी काही त्यांची नक्कल केली ती त्यांच्यापासून प्रेरित होऊन केली होती. त्यांचा कॉफी विथ करण हा शो मला पाहायला खूप आवडतो. मी त्यांचं खूप निरीक्षण करतो आणि मी त्यांच्या कामाचा चाहता आहे. मी त्यांचा 'रॉकी और रानी कि प्रेमकहाणी' हा सिनेमा जवळपास ५ ते ६ वेळा पाहिला आहे. त्यांना दुखावण्याचा माझा हेतू नव्हता. मला फक्त प्रेक्षकांचं मनोरंजन करायचं होतं पण जर मी त्यांना दुखावलं असेन तर मी त्यांची माफी मागतो. "

कोण आहे केतन सिंह?

केतन हा एक कॉमेडियन असून सध्या तो सोनी हिंदी टेलिव्हिजनवर प्रसारित होणाऱ्या 'मॅडनेस मचायेंगे' या रिऍलिटी शोमध्ये सहभागी आहे. केतनने यासोबतच अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय लोकप्रिय 'कपिल शर्मा शो'मध्येही त्याचा काही काळ सहभाग होता.

विकी वेलिंगकर, सेव्हन अव्हर्स टू गो, जॉनी जंपर या सिनेमांमध्ये त्या काम केलं आहे.

Actor Ketan Singh apologies to Karan Johar after social media Post
Karan Johar New Movie : तब्बल बारा वर्षानंतर करणच्या चित्रपटात दिसणार काजोल, 'सरजमी' चित्रपटाची घोषणा!

काय आहे प्रकरण?

सोनी टेलिव्हिजनवरील मॅडनेस मचायेंगे या शोच्या एका स्किटमध्ये केतनने करणची नक्कल केली होती. शो चा हा प्रोमो करणने टेलिव्हिजनवर पहिला आणि त्याला केतनने केलेली नक्कल अपमानास्पद वाटली. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने त्याची नाराजी जाहीर केली.

“मी माझ्या आईबरोबर बसून टीव्ही बघत असताना एका प्रतिष्ठित चॅनेलवर मी एका नामांकित रिअ‍ॅलिटी कॉमेडी शोचा प्रोमो पाहिला. त्यात एक कॉमेडी स्किट होतं त्यातील एका कलाकाराने माझी अतिशय वाईटरित्या नक्कल केली. ट्रोलर्स आणि निनावी लोकांकडून मी अशी अपेक्षा करू शकतो परंतु जेव्हा तुमचीच इंडस्ट्री अशा व्यक्तीचा अनादर करते जी व्यक्ती २५ वर्षांपासून या इंडस्ट्रीत आहे, ही गोष्ट सध्याचा काळ कसा आहे हे दाखवून देतेय यामुळे या गोष्टीचा मला राग नाही आला पण मला याचं खूप वाईट वाटलं.” अशी पोस्ट करणने सोशल मीडियावर शेअर केली. त्याच्या पोस्टनंतर निर्माती एकता कपूरनेही त्याची साथ देत कॉमेडीयन्सला खडेबोल सुनावले.

केतनच्या या माफीनंतर करण काय प्रतिक्रिया देणार या कडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. शिवाय या प्रकरणानंतर संबंधित चॅनेल हे वादग्रस्त स्किट त्या शोमध्ये ठेवणार कि नाही याचीही चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

Actor Ketan Singh apologies to Karan Johar after social media Post
Karan Johar: 'मेकअप से फितरत नहीं बदलती...' कॉस्मेटिक सर्जरी करणाऱ्यांना KJo ने फटकारले, वाचा व्हायरल पोस्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com