Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

Sharad Pawar: मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) एक ट्वीट शेअर केलं आहे.
Sharad Pawar,Hemant Dhome
Sharad Pawar,Hemant Dhomeesakal

Sharad Pawar: सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात वहात आहेत. अशातच सगळ्या पक्षांचे नेते जोरदार प्रचार करत आहेत. प्रचार दौऱ्यांमुळे दगदग झाल्याने ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची प्रकृती सध्या बरी नसल्याची माहिती आहे. त्यामुळे सोमवारचे त्यांचे सगळे कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. अशातच आता शरद पवार यांच्यासाठी मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) एक ट्वीट शेअर केलं आहे.

हेमंत ढोमेचं ट्वीट

हेमंत ढोमे यानं शरद पवार यांचा एक फोटो ट्विटरला शेअर केला आहे. या फोटोला त्यानं कॅप्शन दिलं, "आदरणीय साहेब…आपली मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी आम्हा तरूणांना देखील थक्क करणारी आहे… पण कृपया स्वतःची काळजी घ्या… तब्येत जपा… खंडोबा आपणांस लवकरात लवकर बरे करो…"

शरद पवार यांनी रद्द केले कार्यक्रम

शरद पवार यांची तब्येत बिघडल्यामुळे सोमवार, दि. ६ मे रोजी त्यांचे सर्व नियोजित कार्यक्रम करण्यात रद्द करण्यात आलेले आहेत. शरद पवार यांच्या सभा आणि अनेक कार्यक्रम नियोजित होते. परंतु तब्येत बरी नसल्यामुळे त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

हेमंत हा विविध विषयांवरील त्याची मतं सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत असतो. तो सोशल मीडियावर सक्रिय असतो. सोशल मीडियावरील हेमंतच्या पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात. हेमंतचे विविध चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. काही दिवसांपूर्वी त्याचा झिम्मा-2 हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. चोरीचा मामला, पोस्टर गर्ल, बघतोस काय मुजरा कर या चित्रपटांमध्ये हेमंतनं काम केलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com