

Kiran Mane Post: गेल्या काही महिन्यांपासून सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरण गाजत आहे. बीडच्या मस्साजोग गावचे माजी सरपंच असलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येला बराच काळ उलटूनही अजून अपेक्षित निकाल लागत नसल्याने सर्व माध्यमातून टीका होतेय. त्यातच काल संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर सगळीकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे.