

Mohan Joshi Brain Stroke
ESakal
मराठी सिनेसृष्टीत अनेक उत्कृष्ट कलाकार आहेत. ज्यांची तुलना इतर कुणाशी होऊ शकत नाही. त्यातलेच एक दिग्गज अभिनेते म्हणजे मोहन जोशी. मोहन यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडली. कोणतीही भूमिका असो ती त्यांनी ऊत्तम पद्धतीनेच वठवली. 'जुळून येती रेशीमगाठी' सारखी मालिका असो किंवा 'देऊळ बंद २' सारखा सिनेमा असो. त्यांच्या अभिनयाचं कौतुक झालं. मात्र काही वर्षांपूर्वी मोहन जोशी यांना ब्रेन स्ट्रोक आला होता. ज्यामुळे त्यांनी 'देऊळबंद २'ला नकार दिलेला. आता 'मित्र म्हणे'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या पत्नी ज्योती जोशी यांनी त्यांना आलेल्या ब्रेन स्ट्रोकदरम्यान काय घडलेलं ते सांगितलंय.